बीड – राज्य सरकारने कडक निर्बंध 1 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी रविंद जगताप यांनी देखील जिल्ह्यासाठीचे नियम जाहीर केले आहेत .त्यानुसार शनिवारी मध्यरात्री बारा वाजेपासून ते 25 मे पर्यंत मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत .
जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी जगताप यांनी राज्य शासनाच्या कडक निर्बंधामध्ये काही वाढ केली होती .त्यानुसार आता 15 मे च्या मध्यरात्रीपासून 25 मे च्या मध्यरात्री पर्यंत किराणा, भाजीपाला,मटण,चिकन,मिठाईची दुकाने बंद राहतील .

केवळ या काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारी मेडिकल,दवाखाने,निदान क्लिनिक,लसीकरण केंद्रे,वैद्यकीय विमा केंद्रे,पेट्रोल पंप व इतर सुविधा सुरू राहतील .बँकेचे व्यवहार हे सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहतील .खते बी बियाणे ची दुकाने सुरू राहतील .स्वस्त धान्य दुकाने 21 पासून सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहतील असेही आदेशात म्हटले आहे .