November 26, 2022

जिल्ह्यात 3224 निगेटिव्ह तर 1258 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 3224 निगेटिव्ह तर 1258 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4482 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1258 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3224 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 188 आष्टी 140 बीड 310 धारूर 77 गेवराई 75 केज 128 माजलगाव 88 परळी 58 पाटोदा 73 शिरूर 61 वडवणी 60

दिलासादायक आकडेवारी: राज्यातून 61,607 रुग्ण बरे झाले

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 37,323 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा दिलासादायक आहे. दुसरीकडे आज राज्यातून 61,607 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आजपर्यंत एकूण 44,69,425 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.97 % एवढे झाले आहे.

आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले असून राज्यात आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. मुंबईत आज 1794 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज रोजी एकूण 5,90,818 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

देशात 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त

सोमवारी दिवसभरात 3 लाख 29 हजार 942 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासात 3 हजार 876 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याआधी रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले होते. तर गेल्या आठवड्यात बुधवार ते शनिवार लागोपाठ चार दिवस दररोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या सव्वा तीन लाखांवर खाली आली आहे.

आतापर्यंत देशात 2 कोटी 26 लाख 92 हजार 575 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील मृतांची संख्या 2 लाख 49 हजार 992 इतकी झाली असून सध्या 37 लाख 15 हजार 221 जण उपचार घेत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click