September 27, 2021

कोरोना काळात पालकमंत्री मुंडेंचा सेवाधर्म ! बाधित कुटुंबांना विवाह कार्यासाठी दहा हजार तर 100 बेड चे लोकार्पण !!

कोरोना काळात पालकमंत्री मुंडेंचा सेवाधर्म ! बाधित कुटुंबांना विवाह कार्यासाठी दहा हजार तर 100 बेड चे लोकार्पण !!

परळी – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना दिलासा व आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेवाधर्म या उपक्रमातील विविध सेवांची आज धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. सेवाधर्म अंतर्गत आज पंचायत समिती शासकीय निवासस्थान येथे उभारण्यात आलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र 100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.तसेच कोविड झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना विवाह कार्यासाठी दहा हजार रुपये मदतनिधी देण्यात आला .

यावेळी ना. मुंडेंनी येथे उपलब्ध सर्व सुविधांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला असून, परळीतील डॉ. गुरुप्रसाद देशपांडे व डॉ. आनंद टिम्बे व इतर काही डॉक्टर्स देखील येथे सेवा देणार आहेत.

सेवाधर्म अंतर्गत शहरातील फूड प्लाझा येथे राष्ट्रवादी आधार केंद्र उभारण्यात आले असून, याद्वारे आवश्यक तिथे निर्जंतुकीकरण फवारणी, नागरिकांना लसीकरण साठी मदत, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हे मदत केंद्र कार्यरत राहणार आहे. या मदत केंद्रातून कोरोना बाधित तीन कुटुंबातील विवाहकार्यासाठी मदतनिधी ना. मुंडेंच्या हस्ते देऊन याचे आगळे वेगळे उद्घाटन संपन्न झाले.

परळीतील विविध रुग्णालयात काम करत असलेल्या 500 कोरोना योध्याना मोफत टिफीन डबे देण्यात येत असून, आज ना. मुंडेंच्या हस्ते याची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोना बाधित झालेल्या गरीब व गरजू कुटुंबातील विवाहकार्यासाठी सेवाधर्म अंतर्गत 10 हजार रुपये मदतनिधी देण्यात येत आहे. आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील मिलिंद घाटे, उत्तम बोराडे व बळीराम आटोळे या तीन कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये मदतनिधीचे धनादेश वाटप करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी सेवाधर्म मार्फत एक ट्रॅक्टर फवारा उपलब्ध करून देण्यात आला असून, या ट्रॅक्टरद्वारे आजपासून निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सेवाधर्म अंतर्गत प्रत्येक खाजगी रुगणालायत दाखल असलेल्या रुग्णांना मोफत जेवण देण्यात येते, जेवण, रेमडीसीविर इंजेक्शन अन्य औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात फोन स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. यांपैकी 25 स्वयंसेवकांना आज कोरोना कवच किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. पल्स ऑक्सिमिटर, जलनेती पात्र, मास्क, सॅनिटायझर, साबण आदी बाबींचा त्यात समावेश आहे. परळीतील सर्व कोरोना योध्याना हे किट देण्यात येणार आहे.

शहर व ग्रामीण भागात लसीकरणासंदर्भात व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे, त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. परळीत लसीकरण केंद्रांवर ये-जा करण्यासाठी बससेवा सुरू केली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, तसेच कोरोनाबाबतचे नियम पाळून वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *