बीड – लॉक डाऊन च्या काळात नियम आणि अटींचे पालन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला,यात सर्वात जास्त सहकार्य व्यापारी वर्गाने केले,मात्र काही व्यपाऱ्यांनी यातही चलाखी करत धंदा केला,महसूल आणि पोलीस प्रशासनाने नुकतीच अकरा दुकानावर कारवाई केली मात्र 24 तासात ही दुकाने पुन्हा उघडण्यात आली आहेत,मग ज्यांनी इमानदारीने प्रशासनाला सहकार्य केले त्या व्यपाऱ्यांनी चूक केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे .
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलत 25 मार्च पासून लॉक डाऊन जाहीर केले,त्यानंतर राज्य शासनाने 5 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले,पुढे हे निर्बंध अधिक कडक करत 15 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवला.
दरम्यान बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात बुधवार 12 मे पर्यंत अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता इतर दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश दिले .या दरम्यान कपडा व्यापारी,बांगडी व्यापारी,हार्डवेअर, जनरल स्टोर ,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक सुवर्णकार व इतर दुकानदारांनी प्रशासनाचे आदेश पाळत बऱ्यापैकी आपले दुकान बंद ठेवली,काही कपडा व्यपाऱ्यांनी दुकाने सुरू केल्यानंतर त्यांना दंड झाला अन इतर व्यापारी शहाणे झाले .
दरम्यान बीडच्या मोंढा भागातील काही किराणा दुकानदारांनी दोन तीन दिवस पहाटे चार ते सात यावेळेत आपली दुकाने सुरू ठेवली .याची माहिती मिळताच प्रशासनाने अकरा दुकाने सील करण्याची कारवाई केली .दरम्यान ही कारवाई रविवारी झाली अन सोमवारी सायंकाळी या दुकानदारांना प्रत्येकी दहा ते बारा हजार रुपये दंड व वरती तीन चार हजार रुपये घेऊन सील काढण्याची कारवाई करण्यात आली .
याचाच अर्थ ज्यांनी इमानदारीने प्रशासनाला सहकार्य करून दुकाने बंद ठेवून मदतीची भूमिका घेतली त्यांनी पुढच्या वेळी ही चूक न करणे योग्य आहे का असा सवाल विचारला जात आहे .ज्यांनी नियम मोडले त्यांची दुकाने किमान आठ पंधरा दिवस बंद ठेवून त्यांना जबर शिक्षा करणे आवश्यक होते मात्र प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर मागे सरकले हे न उलगडणारे कोडे आहे .