बीड – बीड जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात 1273 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून गेवराई तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली आहे . त्याचसोबत बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने बीडची चिंता वाढली आहे .
रविवार रोजी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 295,वडवणी 42,धारूर 32,केज 117,परळी 19,गेवराई 347,पाटोदा 39,अंबाजोगाई 152,आष्टी 43,शिरूर 43 आणि माजलगाव मध्ये 64 रुग्ण सापडले आहेत .
जिल्ह्यातील ही रुग्णवाढ गेल्या महिनाभरापासून सातत्याने सुरू असून खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात देखील बेड शिल्लक नसल्याने आता रुग्णांना बाहेर गावी उपचारासाठी जावे लागत आहे .