November 26, 2022

चीनचे रॉकेट अरबी समुद्रात कोसळले !

चीनचे रॉकेट अरबी समुद्रात कोसळले !

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर पृथ्वीवर कोसळले आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळल्याचे वृत्त ‘एएफपी’ न्यूजने दिले आहे.हे रॉकेट पृथ्वीवर कोसळले असते तर मोठी हानी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती,मात्र हे संकट टळले आहे .

29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता.

हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे

अंतराळात रॉकेटचा मुख्य भाग फिरत होता. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब होते. याचे वजन तब्बल 21 टन होते. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या रॉकेटचे तुकडे झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेटचे काही अवशेष अरबी समुद्रात कोसळले आहेत.

रॉकेटचा वेग 7 किमी प्रतिसेकंद

पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click