बीड – जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी देखील तेराशे पार गेला,बीड,अंबाजोगाई,परळी आणि केज या चार तालुक्यात मिळून जवळपास आठशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत .बाधितांचा हा वाढत जाणारा आकडा चिंता वाढवणारा असून आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 242,बीड 327,परळी 136,केज 210,माजलगाव 60,धारूर 96,आष्टी 19,पाटोदा 75,शिरूर 62,गेवराई 54,वडवणी 59 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात चार ते पाच तालुक्यातील रुग्णसंख्या गेल्या महिना भरापासून कमालीची वाढते आहे,प्रशासनाने लॉक डाऊन कडक केला तरीदेखील रुग्णसंख्येला आळा बसत नसल्याचे चित्र आहे .