September 20, 2021

एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!

एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!

अंबाजोगाई – कोरूना ची वाढती रुग्ण संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील बीड केअर सेंटर मध्ये अतिरिक्त ऑक्सीजन प्लांट नवीन ऑक्सिजन मशीन, ऑक्सीजन बेड , बालकांसाठी म्हणून स्वतंत्र ऑक्सिजन वार्ड तयार करण्यास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव च्या कोविड केअर सेंटर मध्ये वाढत्या रुग्ण संख्या मुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे त्यामुळे याठिकाणी अधिकच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे

कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन या लाटेमध्ये लहान मुलांना या आजाराची लागण होऊ शकते हे त्यामुळे स्वतंत्र ऑक्सीजन वार्ड केवळ लहान बालकांसाठी तयार करणे आवश्यक आहे

त्याच बरोबर या दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर तसेच अधिकचे ऑक्सीजन प्लांट,व्हेंटिलेटर बेड तयार करणे आवश्यक आहे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार मुंदडा यांनी केली आहे

त्याच सोबत या महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयात पुरेसा स्टाफ नसल्यामुळे आरोग्य सुविधांवर ताण येत आहे. सहयोगी प्राध्यापक डॉक्टर स्टाफ नर्स वॉर्डबॉय यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे . रिक्त पदे तातडीने भरणे देखील आवश्यक आहे .ऑक्सिजन कॉन्सट्रेटर तसेच बायपेप मशीन ,व्हेंटिलेटर बेड ची संख्या वाढवणे आवश्यक आहे. या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे .

तसेच केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील ज्या रुग्णांची rt-pcr चाचणी केली जाते त्याचा अहवाल येण्यासाठी उशीर लागतो त्यामुळे rt-pcr चाचणी दोन टप्प्यात करून अहवाल तातडीने देण्यासाठी सुविधा निर्माण करावी अशी देखील मागणी आमदार मुंदडा यांनी केली आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *