बीड – कडक लॉक डाऊन सुरू असताना टाकळसिंग येथून कर्तव्य बजावून बीडला येत असताना डॉ विशाल वनवे यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली,त्यानंतर या डॉक्टर ने प्रचंड आरडाओरडा केला,बोंब मारली,मीडियाने प्रकरण उचलून धरले,डॉक्टर संघटनेने कामबंद आंदोलन केले अन या डॉक्टर महाशयांनी तक्रार द्यायलाच नकार देत सगळ्यांना तोंडावर पाडले .त्यामुळे आता या डॉक्टर बद्दलच तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत .
बीडमध्ये पोलिसांनी हेल्मेट साठी आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना बेदम मारहाण केल्याच्या घटना बुधवारी घडल्या .अनेकवेळा याबाबत मिडियामधून ओरड झाली,पोलिसांच्या कार्यपद्धती बद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली .
बुधवारी आपले काम संपवून बीडला येणारे डॉक्टर विशाल वनवे यांना उपअधीक्षक संतोष वाळके अन पथकाने प्रचंड मारहाण केली .हा प्रकार कळल्यानंतर डॉक्टर संघटना,मीडिया अन शासकीय कर्मचारी यांनी थेट जिल्हाधिकारी, एसपी यांना तक्रार केली .
स्वतः जिल्हाधिकारी, एसपी,सीईओ या डॉक्टर ला भेटण्यासाठी गेले,प्रचंड मारहाण झाल्याने या डॉक्टर ने पोलीस तक्रार द्यावी असे सगळ्यांचे म्हणणे होते,ज्या पद्धतीने हा प्रकार घडला तो चीड आणणारा होता,याचे पडसाद मिडियामधून उमतल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली .
तीन जणांची चौकशी समिती देखील नियुक्त केली गेली .मात्र ऐनवेळी डॉ वनवे यांनी माघार घेत तक्रार देण्यास नकार दिला,त्यामुळे सगळेच तोंडावर पडले .जर तक्रार द्यायची नव्हती तर मग एवढी आरडाओरड का केली असा सवाल आता विचारला जात आहे .