बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या गुरुवारी पुन्हा एकदा दीड हजाराच्या घरात पोहचली .जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यातील रुग्णसंख्या दररोज वाढत असल्याने जिल्ह्याचा आकडा कमी होताना दिसत नाहीये .जिल्ह्यात 1437 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील बीड 345,आष्टी 84,अंबाजोगाई 242,पाटोदा 126,परळी 58,शिरूर 90,केज 195,गेवराई 107,माजलगाव 58,वडवणी 47,धारूर 85 असे रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा रुग्णालयासह कोविड केयर सेंटर देखील हाऊसफुल झाले असून खाजगी रुग्णालयात देखील बेड मिळत नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .