बीड – बीडचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांना जिल्हा रुग्णालयात धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी सहा जनावर गुन्हा दाखल करत त्यांची चामडी लोळवली मात्र याच वाळके आणि पथकाने डॉक्टर ला गुरासारखे मारून चोवीस तास उलटले तरी कोणतीच कारवाई झाली नाही,पोलिसांची ती वर्दी अन डॉक्टर लोक काय रस्त्यावर पडलेत का?असा प्रश्न उपस्थित होत आहे .एकीकडे न्यायालय लाठीचार्ज करू नका अस सांगत असताना वाळके सारखे लोक न्यायलयापेक्षा मोठे असल्यासारखं का वागत आहेत हे न उलगडणार कोड आहे .
बीडमधील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन दिवस कडक लॉक डाऊन जाहीर केले .हे होताच पोलिसांच्या अंगात स्फुरण चढले .रस्त्यावर जो कोणी दिसेल मग तो शासकीय कर्मचारी असो की बँक कर्मचारी किंवा डॉक्टर या सगळ्यांना बडवण्याचं काम सुरू झालं .
बीड मध्ये तर पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके अन त्यांच्या पथकाने डॉक्टर विशाल वनवे यांच्यासह काही मेडिकल चालकांना गुरासारखे बदडून काढले .डॉ वनवे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आलीच असून अजूनही ते नॉर्मल नाहीत .
वाळके यांच्याबाबत जिल्हा रुग्णालयात जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहेच,मात्र त्यानंतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जो धुडगूस घालून मारहाण केली ती समर्थनीय असूच शकत नाही .या प्रकरणात पोलिसांनी सहा जनावर गुन्हे दाखल करून त्यांचा समाचार घेतला .
मात्र त्यानंतर याच वाळके यांनी डॉ वनवे यांना जी मारहाण केली त्यात अजूनही कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही.केवळ एक त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त करून चौकशी लावली आहे . या प्रकरणात वाळके यांनी जे केले ते निंदनीय आहे .डॉक्टर असो की मेडिकल स्टाफ अथवा बँक कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी सगळे कोविड काळात चोवीस तास काम करत आहेत .
अशावेळी या लोंकांवर लाठ्या काठ्या चालवून पोलीस कसली मर्दुमकी दाखवत आहेत .त्यांना जर एवढाच बळाचा वापर करण्याची हौस असेल तर वाळू माफिया,गुटखा माफिया,रेशन माफिया,क्लब चालक,मटका चालक यांच्यावर करावा,मात्र तिथं तोडीपाणी करायची अन कोविड काळात मेहनत घेणाऱ्यांची पाठ सोलून काढायची हे वागणं बर नव्हे .
या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतः तसेच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून वाळके यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करून कायदा सगळ्यांना समान असतो हेच दाखवून देणे गरजेचे आहे .पोलिसांनी सामान्य लोकांवर काठ्या चालवणे बंद करून आपण कायद्याचे रक्षक आहोत हे लक्षात ठेवावे अन्यथा आज डॉक्टर लोकांनी कामबंद केले उद्या जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही .