बीड – बीड जिल्ह्यामध्ये कळत लॉकडाउन चे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिल्यानंतर पोलिसांच्या अंगात सैतान शिरल्या सारखं ते वागू लागले आहेत रस्त्यावर डॉक्टर असो की बँक कर्मचारी अथवा शासकीय कर्मचारी यांना हेल्मेट सक्ती करत गुरासारखा बेदम मारण्याचे प्रकार होत आहेत जगताप साहेब एकीकडे कोर्ट सांगतं की नगरपालिका हद्दीत हेल्मेट सक्ती करायची गरज नाही आणि दुसरीकडे आपलं नाव घेऊन पोलीस हेल्मेट नसणाऱ्यांना दंडुके घालत आहेत पोलिसांची दादागिरी तुम्हीच थांबवा आणि हेल्मेट सक्तीचे आदेश मागे घ्या अन्यथा जनतेत रोष निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
बीड जिल्ह्यामध्ये कोरुना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे एकीकडे आरोग्यव्यवस्था कमी पडत असताना दुसरीकडे वाढत जाणारे रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसासाठी मेडिकल वगळता इतर सर्व स्थापना बंद ठेवण्याचे आणि कडक लॉक डाउन करण्याचे आदेश दिले होते
या आदेशाचे पालन सर्व नागरिकांकडून व्यवस्थित होत आहे मात्र शासकीय कार्यालय बँक सर्वे करणारे शिक्षक तसेच मेडिकल ची संबंधित लोक यांना कामासाठी बाहेर पडावे लागत आहे अशा परिस्थितीत त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचे आयडेंटी कार्ड लायसन आणि आधार कार्ड असतानादेखील पोलीस मात्र अंदाज सैतान घेतल्या सारखे वागत आहेत विशेषतः पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके सारखा माणूस हा लोकांना गुरासारखा बडवत आहे
वाळके आणि त्यांच्या पथकाने दिवसभरात काही शिक्षक मेडिकल स्टाफ आणि चराटा फाटा येथे एका डॉक्टरला बेदम मारहाण केली बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत मात्र कोणत्याही शहरांमध्ये हेल्मेट सक्ती करता येऊ शकत नाही आणि तेही अशा लोक डाऊन च्या काळात ज्या वेळी सर्वच दुकाने बंद आहेत तर हेल्मेट आणायची कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
जिल्हाधिकाऱ्यांना जर हेल्मेट सक्ती करायची असेल रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांकडे नवे हेल्मेट द्यावेत आणि जो विना हेल्मेट फिरत आहे त्याला दंड करण्याऐवजी हेल्मेट देऊन त्याच्याकडून त्याच्या दीडपट पैसे आकारावे असे केल्यास नागरिकांची देखील सोय होईल मात्र हे करण्याऐवजी पोलीस नागरिकांना बेदम मारहाण करून जाणीवपूर्वक जनतेमध्ये रोष निर्माण करत आहेत