January 30, 2023

बीड जिल्ह्यासाठी पुरेशी लस आणि ऑक्सिजन उपलब्ध !

बीड जिल्ह्यासाठी पुरेशी लस आणि ऑक्सिजन उपलब्ध !

बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा आता नियमित होऊ लागला आहे. तसेच काल जिल्ह्याला कोव्हीशिल्ड लसीचे 44500 आणि कॉव्हॅक्सिन लसीचे 12000 असे एकूण 56 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत.

18 वर्षांवरील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून लस देणे तसेच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना विहित वेळेत दुसरा डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

बीड जिल्ह्यात 04 मे रोजी कोव्हीशिल्ड चे 44500 तर कोव्हॅक्सिनचे 12000 डोस प्राप्त झाले. कोव्हॅक्सिनचे सर्व डोस प्रथम लसीकरण होत असलेल्या 18 वर्षे वरील वयाच्या व्यक्तींना वापरण्यात यावेत अशा सूचना असल्यामुळे कोव्हॅक्सिनचे बीड येथे 2500, अंबाजोगाई येथे 2000 तर माजलगाव, धारूर, वडवणी, शिरूर कासार आणि पाटोदा येथे प्रत्येकी 1500 डोस पुरवण्यात आले आहेत.

कोव्हीशिल्डच्या प्राप्त 44500 लसींमधून 60% लसी या दुसऱ्या डोस साठी राखीव असून 40% लसी या पहिल्या डोस साठी उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात व ग्रामीण आरोग्य केंद्रांवरील लसीकरण केंद्रात उरलेला स्टॉक व उपलब्ध स्टॉक यानुसार ऑनलाईन सुरू असलेल्या नोंदणी प्रमाणे लसींचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये परळीत 3600 तर प्रत्येक ग्रामीण लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 600 प्रमाणे, आष्टी 3000 व ग्रामीण 600 प्रमाणे, अंबाजोगाई 3600 व ग्रामीण 600 प्रमाणे, धारूर 1800 व ग्रामीण 600 प्रमाणे, गेवराई 3600 व ग्रामीण 600 प्रमाणे, केज 3600 व ग्रामीण 600 प्रमाणे, माजलगाव 3000 व ग्रामीण 600 प्रमाणे, पाटोदा 2400 व ग्रामीण 600 प्रमाणे, शिरूर 600 व ग्रामीण 600 प्रमाणे, वडवणी 1200 व ग्रामीण 600 प्रमाणे, स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालय प्रत्येकी 1500, यासह शहरी लसीकरण केंद्रांमध्ये असे मिळून एकूण 44500 लसींचे वितरण करण्यात आले आहे.

18 वर्षांवरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून आपली अपॉइंटमेंट घ्यावी व त्यानुसारच ठरलेल्या वेळेत लसीकरण केंद्रावर यावे. तसेच दुसऱ्या डोस साठी पहिल्या नोंदणीचा वापर करून आपल्या दुसऱ्या डोस साठी वेळ निश्चित करूनच लसीकरण केंद्रावर यावे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले बेड, त्या प्रमाणात लागणारा ऑक्सिजन तसेच लसीकरण प्रक्रिया यावर आपण बारकाईने लक्ष केंद्रित केलेले असून, ऑनलाईन नोंदणीप्रमाणे लसीकरण प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासू नये यासाठी आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत असून, याबाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी चर्चा देखील केली आहे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेले लसीचे डोस संपण्याच्या आत पुढील स्टॉक उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, ऑनलाईन नोंदणीप्रमाणे आपली अपॉइंटमेंट निश्चित करूनच केंद्रावर लसीकरण करण्यासाठी जावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click