बीड – बीड जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यात पुन्हा एकदा 1439 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कडक लॉक डाऊन लावण्यात आल्याने रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होईल का याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे .
बीड जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 328,अंबाजोगाई 280,परळी 127,केज 150,माजलगाव 70,धारूर 68,आष्टी 71,पाटोदा 38,शिरूर 138,गेवराई 130 आणि वडवणी मध्ये 39 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील विविध भागात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची अँटिजेंन टेस्ट करण्यात येत असून गेल्या दोन दिवसात जिल्हाभरात दीड हजार पेक्षा अधिक लोकांची अँटिजेंन केली असता 80 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह हे सुपर स्प्रेडर म्हणून फिरत असल्याचे आढळून आले आहे .