बीड -जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा 1500 च्या घरात पोहचला,बीड तालुक्यात तीनशे पेक्षा अधिक तर अंबाजोगाई आणि शिरूर तालुक्यात दोनशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील बीड 381,वडवणी 81,धारूर 68,केज 151,परळी 126,गेवराई 119,पाटोदा 59,अंबाजोगाई 212,आष्टी 58,शिरूर 206,माजलगाव 68 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नसल्याने प्रशासनाने बुधवारपासून जिल्ह्यात कडक लॉक डाऊन ची घोषणा केली आहे .बुधवार ते शुक्रवार दरम्यान हे लॉक डाऊन असणार आहे .तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची अँटिजेंन टेस्ट देखील केली जात आहे .