बीड – बीड जिल्ह्यातील वाढते कोरुना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासनाने अधिक घडत पावले उचलणे सुरुवात केली असून बुधवार ते शुक्रवार पर्यंत तीन दिवस मेडिकल वगळता किराणा सहित सर्व स्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत तसेच शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळेत रस्त्यावर उभा राहून तुम्हाला फिरून फळ विक्री करता येणार आहे
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून लॉक डाऊन ची परिस्थिती आहे मात्र तरीदेखील रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी 200 300 500 वरून ती थेट आता दीड हजार रुग्ण संख्या पर्यंत पोचली आहे लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत विना मास रस्त्यावर फिरत आहेत अशी परिस्थिती राहिली तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची संख्या कमी होईल आणि बीड मात्र सगळ्यात पुढे जाईल बीड जिल्ह्यातील वाढते करून रुग्ण संख्या पाहून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीदेखील चिंता व्यक्त केली


त्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी याबाबत आता अधिक कड धोरण अवलंबले आहे मध्यंतरी बीडच्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तीन-चार बैठकीत रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची गय करू नका बाहेरून शटर बंद आणि आतून सगळे सुरू अशी परिस्थिती जिल्ह्यात असल्याचे सांगत असा मिळमिळीत लोक डाऊन नको खडक लोक डाऊन करा असे सुचवले होते
त्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची एजंट एस देखील जागेवरच सुरू केली होती तरीदेखील रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर आता बुधवार म्हणजे पाच मे ते शुक्रवार सात मे पर्यंत तीन दिवस वैद्यकीय क्षेत्र वगळता इतर सर्व किराणा सहित आस्थापना तीन दिवस कडेकोट बंद राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अथवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असेही म्हटले आहे .
दूध वितरण सकाळी सात ते अकरा या वेळेत होईल तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत फळ विक्री कॉलनी कॉलनी मध्ये फिरून करता येईल असेही या आदेशात म्हटले आहे या नव्या नियमांमुळे रुग्ण संख्या कमी झाली तर आरोग्य व्यवस्थेवरील ताण निश्चितपणे कमी होईल नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जगताप यांनी केले आहे