March 22, 2023

पालकमंत्री मुंडेंच्या अचानक भेटीने यंत्रणा टाईट !

पालकमंत्री मुंडेंच्या अचानक भेटीने यंत्रणा टाईट !

अंबाजोगाई – रविवारी रात्री बीड जिल्हाधिकारी अचानक भेट दिल्यानंतर आज (सोमवार) दुपारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आज अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी दाखल असलेली एकूण रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडीसीविर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा या सर्वच बाबींचा बारकाईने आढावा घेतला.तसेच हलगर्जीपणा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील दिला .

स्वाराती रुग्णालयात एकूण ऑक्सिजन बेडची संख्या व उपलब्ध संसाधने पाहता आणखी 50 बेड वाढविणे शक्य आहे, ते बेड तातडीने तयार करून रुग्णांसाठी खुले करावेत असे निर्देश यावेळी ना. मुंडेंनी रुग्णालय प्रशासनास दिले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी एक एक बेड, रेमडीसीविर इंजेक्शन, अन्य औषधी, पीपीई किट या सर्वच बाबींची विचारपुस केली व ऑक्सिजन पुरवठा गरजेनुसार, सुरळीत व अपव्यय टाळून करावा याबाबत सूचना केल्या. यावेळी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, वाल्मिक अण्णा कराड, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैधकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. नितीन चाटे, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता श्री. बनसोडे, महावितरणचे अभियंता संदीप चाटे, शिवाजी सिरसाट, दत्ता आबा पाटील, विलास राव सोनवणे, रणजित चाचा लोमटे आदी उपस्थित होते.

स्वाराती मध्ये सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्सच्या ड्युटीचे विवरण तपासावे, तसेच सेप्शलिस्ट व उपलब्ध असलेल्या अन्य डॉक्टरांची किमान दोन दोन तासांची सेवा लोखंडी येथील रुग्णालयास उपलब्ध करून द्यावी असेही यावेळी ना. मुंडेंनी सुचवले आहे.

पर्यायी विद्युत पुरवठा तातडीने उभा करा

स्वाराती रुग्णालयास ऑक्सिजन प्लांट व अन्य बाबीत होणारा विद्युत पुरवठा नियंत्रित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेले इंजिनिअर, तंत्रज्ञ तसेच वायरमन यांची संख्या मर्यादित असल्याने ना. मुंडेंनी सा. बा. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची चांगलीच शाळा घेतली.

माणसे उपलब्ध नसतील तर प्रशिक्षित तरुण, रिटायर झालेले अनुभवी तज्ञ अशा तंत्रज्ञाची तातडीने नेमणूक करा, त्यांचा पगार स्वाराती प्रशासन देईल, प्रसंगी महावितरण व महानिर्मिती यांची मदत घ्या; असेही यावेळी ना. मुंडे यांनी सुचवले आहे.

दरम्यान स्वाराती मधील विद्युत पुरवठ्याला 11 केव्ही ची भूमिगत किंवा लाईन टाकून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे, परंतु याला देखील सा.बा. व महावितरणचे अधिकारी उदासीन असल्याचे दिसून आले.

यावेळी धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम व महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्यायी मार्ग सुचवले. 11 केव्ही लाईन साठी केबल वायर मिळत नसेल तर ती मी उपलब्ध करून देतो, पण यात कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा मुंडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

मागील बैठकीत देखील सांगितले होते, लोकांचे जीव वाचविणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक विभागाने जीव ओतून व अनुभव पणाला लावून काम करावे, लोकांचे जीव वाचविण्यात जर आता मानवी चुकांमुळे अडथळा आला, तर मी कोणाचीही गय करणार नाही, संबंधितांना कारवाईला सामोरे जवळ लागेल, अशी तंबीच यानिमित्ताने बोलताना धनंजय मुंडे यांनी महावितरण चे अधिकारी व स्वाराती प्रशासनास दिली आहे.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मिळून स्वतंत्र सबस्टेशन दिलेले आहे, मात्र इथे तज्ञ लोक मिळत नाहीत, जनरेटरला डिझेल भरायला 5 तास वेळ लागतो, 1 कीमी ची केबल वायर मिळत नाही, अशा तक्रारींवरून ना. मुंडेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली; तर धनंजय मुंडे यांनी अधोरेखित केलेले बारकावे पाहून अधिकाऱ्यांसह उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या!

तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटरला ना. मुंडेंनी दिली भेट; 50 बेडचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करण्याचे निर्देश

धारूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तेलगाव येथे अनेक सुविधा उपलब्ध असलेले ट्रामा केअर सेंटर बंद अवस्थेत होते, ते ताब्यात घेऊन तिथे 50 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल निर्माण करण्याचे निर्देश ना. मुंडेंनी आरोग्य विभागाला दिले होते.

आज दुपारी धनंजय मुंडे यांनी तेलगाव येथील या ट्रामा सेंटर ला भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. येथे आता 35 बेड तयार अवस्थेत आहेत, तर आणखी 15 उभारण्यात येत आहेत. ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी पाईपलाईन व अन्य सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत. माजलगाव व धारूर येथून फिजिशियन व अन्य डॉक्टर्स च्या सेवा उपलब्ध करून घ्याव्यात व तातडीने हे कोविड केअर सेंटर सुरू करावे असे निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यावेळी माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. साबळे, धारूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आदमाने, तेलगावचे सरपंच दीपक लगड आदी उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click