बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी देखील बाराशे पार गेल्याचे दिसून आले .3775 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 2489 निगेटिव्ह आले असून बीड सह पाच तालुक्यातील आकडेवारी शंभर अन दोनशे पार गेली आहे .
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 237,बीड 279,आष्टी 101,पाटोदा 65,परळी 122,शिरूर 47,केज 143,गेवराई 55,माजलगाव 88,वडवणी 55,धारूर 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत .
जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता प्रशासनाने आरोग्य सुविधा वाढविल्या आहेत,मात्र जिल्हा रुग्णालयात आणि कोविड केयर सेंटर मध्ये जागा कमी पडत असल्याचे दिसत आहे .त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .