बीड – कोरुना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांची होणारी फरफट आता थांबणार असून हे इंजेक्शन खाजगी रुग्णालयांनी स्वतः उपलब्ध करून रुग्णांना द्यावे असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत त्यामुळे 1मे महाराष्ट्र दिनापासून या इंजेक्शन साठी आयटीआय येथे नोंदणी करण्याची आवश्यकता नाही .
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील कोरूना बाधित यांचा आकडा हजाराच्या घरात जात आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह खाजगी कोविड केअर सेंटर देखील हाऊसफुल झाले आहेत .अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रेमडिसिव्हीरचा काळाबाजार आणि तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे .
हे इंजेक्शन तातडीने मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले मात्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत होते अखेर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ही सगळी यंत्रणा उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्या हातात सुपूर्द केली आणि काही प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध झाले
दरम्यान 1मे महाराष्ट्र दिनापासून हे इंजेक्शन मिळावे यासाठी खाजगी रुग्णालयांनी नातेवाईकांना आयटीआय मध्ये अर्ज घेऊन पाठवू नये त्याऐवजी रुग्णालय रुग्णालया कडील नोंदणी ई-मेल द्वारे अन्न आणि औषध प्रशासनाला कळवावी आणि त्यानंतर हे इंजेक्शन त्यांना उपलब्ध करून दिले जाईल असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे त्यामुळे आता या इंजेक्शन साठी होणारी नातेवाईकांची फरफट थांबणार आहे