बीड – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभ साधेपणाने पार पडला.यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेने कोरोना पासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आणि प्रशासन सतर्क असल्याचा विश्वास दिला .कोरोना मुक्तीसाठी मास्क,सोशल डिस्टन्स आणि सॅनिटाजेशन ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी अखंड महाराष्ट्राच्या निर्मिती साठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच जिल्हा वासीयांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या समारंभास आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते.