बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वेग हा तीस टक्यांच्या वर गेला असून शुक्रवारी तब्बल 1520 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .4717 रुग्णांची तपासणी केली असता त्यातून 3197 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत .विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यात रुग्णवाढीचा वेग मोठा आहे .
बीड जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 298,अंबाजोगाई 336,पाटोदा 116,केज 198,माजलगाव 65,धारूर 86,आष्टी 187,पाटोदा 65,शिरूर 80,गेवराई 155 आणि वडवणी तालुक्यात 34 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .