अहमदाबाद – गुरुवारी दिवसभरात झालेल्या दोन आयपीएल सामन्यात मुंबई ने राजस्थान चा अन दिल्ली ने कोलकाता चा सहज पराभव केला .मुंबई कडून डिकोक आणि कृनाल पांड्या तर दिल्ली कडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी विजयात मोठा वाटा उचलला .
दुपारी मुंबई आणि राजस्थान च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान ने 171 धावा केल्या,जोस बटलर आणि संजू सॅमसंन यांच्या चाळीस धावांच्या खेळीमुळे वीस षटकात 172 धावांचे टार्गेट मुंबई समोर उभे करण्यात राजस्थान ला यश मिळाले .
मुंबई कडून क्विंटन डिकोक ने 70 तर कृनाल पांड्या ने 39 धावा केल्या . मुंबई ने हा सामना सात गडी राखून सहजपणे 18.3 षटकात जिंकला .
दुसऱ्या सामन्यात कोलकाता ने दिल्ली सोबत खेळताना शुभमन गिल आणि आंद्रे रसेल यांच्या खेळीमुळे कोलकाता ने वीस षटकात केवळ 154 धावांचे टार्गेट दिल्ली समोर ठेवले .
लो स्कोर चे टार्गेट घेऊन उतरलेल्या दिल्ली कडून पृथ्वी शॉ ने पहिल्याच षटकात सलग 6 चौकार मिळवत 25 धाव वसूल केल्या .त्यानंतर शॉ ने 82 धावा ठोकल्या तर शिखर धवन याने 46 धावा केल्या .दिल्लीने हा सामना 7 गडी राखून जिंकला .