बीड – जिल्ह्यात महिना भरापूर्वी दहा ते बारा टक्के आढळणारा कोरोना बाधितांचा रेट अवघ्या महिन्यात 30 टक्यांच्या घरात गेला आहे,जिल्ह्यातील 4397 रुग्णांची तपासणी केली असता त्यात तब्बल 1297 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,एकीकडे रुग्ण वाढत असताना लोक मात्र कोणत्याही कारणाशिवाय रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र कायम आहे .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई – 206,बीड -313,आष्टी 138,पाटोदा 77,परळी 85,शिरूर 82,केज 171,गेवराई 84,माजलगाव 44,वडवणी 34,धारूर 52 इतके रुग्ण प्रत्येक तालुक्यात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा आकडा वेगाने वाढतो आहे,मार्च महिन्यात चारशे पाचशे च्या घरात दररोज आढळून येणारे रुग्ण आज हजार बाराशेच्या घरात आहेत .प्रशासनाने लॉक डाऊन केला,सकाळी सात ते अकरा पर्यंत संचारबंदी लावली तरीही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत .
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सगळे लोक घरात रहा सेफ रहा अस सांगत असताना लोक मात्र किरकोळ कारणासाठी बाहेर पडून स्वतःसह घराच्या लोकांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत .