July 26, 2021

जिल्ह्यात 2471 निगेटिव्ह तर 1086 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 2471 निगेटिव्ह तर 1086 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3557 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1086 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2471 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 203 आष्टी 98 बीड 246 धारूर 62 गेवराई 99 केज 109 माजलगाव 49 परळी 106 पाटोदा 41 शिरूर 21 वडवणी 52

राज्यात 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज 66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर रविवारी 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज एकूण 832 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.51 टक्के आहे.

देशात २ लाख १८ हजार ६२४ रुग्णांनी केली करोनावर मात

देशात, रविवारी (२६ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ५४ हजार ६५३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ८०८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात रविवारी एकूण २ लाख १८ हजार ६२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.


देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९५ हजार ११८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. देशात आत्तापर्यंत १ कोटी ४२ लाख ९६ हजार ७०३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.


एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ४२ लाख ९६ हजार ७०३
उपचार सुरू : २८ लाख ०७ हजार ३८८
एकूण मृत्यू : १ लाख ९५ हजार ११८
करोना लसीचे डोस दिले गेले : १४ कोटी ०९ लाख १६ हजार ४१७

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *