बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा 1237 पर्यंत जाऊन पोहचला,दररोज आकडे वाढत असताना आणि रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन ,बेड चा तुटवडा भासत असताना सामान्य मानूस मात्र कोणतेही निर्बंध न पाळता बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे .बर या लोकांना साधं थांबवून विचारायला देखील पोलीस तसदी घेत नसल्याचं दिसून येत आहे .
बीड जिल्ह्यात ,बीड 232,अंबाजोगाई 225,आष्टी 130,पाटोदा 68,परळी 74,शिरूर 69,केज 129,गेवराई 117,माजलगाव 62,धारूर 72,वडवणी 59 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
अंबाजोगाई, बीड चे आकडे दोनशे पेक्षा कमी होताना दिसत नाहीत,दुसरीकडे जिल्ह्यात नऊशे पेक्षा जास्त रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात येत असल्याने एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल .