November 28, 2021

रेमडिसिव्हीर तालुकास्तरावर मिळणार !

रेमडिसिव्हीर तालुकास्तरावर मिळणार !

बीड – रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी चांगलेच मनावर घेतले असून उद्यापासून तालुक्यातील लोकांना बीडला येऊन नोंदणी करण्याची गरज नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर यादी पाठवतील आणि त्यांना स्टोक मिळून जाईल .

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांची पंधरा दिवसापासून धडपड सुरू आहे .शेकडो लोकांना इंजेक्शन साठी खेटे घालावे लागत आहेत .प्रशासन आणि पुढारी यांच्यात बेबनाव देखील निर्माण झाला .

अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कुचकामी आहेत हे उघडे पडले,या नालायक अधिकाऱ्यामुळे इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याचे समोर आले,त्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांनी ही सगळी जबाबदारी प्रवीण धरमकर यांच्यावर दिली .

धरमकर यांनी याबाबत नुकताच एक आदेश काढला आसून तालुकास्तरावर लोकांनी आता सोमवार पासून बीडला आयटीआय ला येऊन नोंदणी करण्याची गरज राहिलेली नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर ही माहिती बीडला पाठवतील,बीडला इंजेक्शन उपलब्ध झाले की तालुक्याचा कोटा पाठवून दिला जाईल,तो नातेवाईकांना वितरित केला जाईल असे उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी म्हटले आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *