बीड – बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी उघड होत असताना बीडमध्ये एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या नावावर आलेले इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी लपवून ठेवल्याचा अन रुग्णाला हे इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .या डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे .
बीड शहरातील एक डॉक्टर ज्यांना गतवर्षी कोविड योद्धा म्हणून वर्तमानपत्र आणि लोकांनी नावाजल त्या डॉक्टर ने यावर्षी कोविड केयर सेंटर सुरू केले .हे डॉक्टर महाशय काही दिवसापासून जिल्हा रुग्णालयात अनधिकृत पणे गैरहजर आहेत .
या डॉक्टर च्या कोविड केयर सेंटर मध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णाला रेमडिसिव्हीर इंजेक्शन ची आवश्यकता होती,नातेवाईकांनी महत्प्रयासाने इंजेक्शन मिळवले .त्यानंतर हे इंजेक्शन स्टाफ च्या हातात दिले .स्टाफ ने इंजेक्शन दिल्याचे दाखवले मात्र न देता लपवून ठेवले .
या रुग्णालयात जो प्रकार घडला तो गंभीर असून जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे .