October 27, 2021

22 हजाराला इंजेक्शन विक्री करताना दोघांना पकडले !

22 हजाराला इंजेक्शन विक्री करताना दोघांना पकडले !

बीड – एकीकडे कोरोना बाधित रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची अन नातेवाईकांची फरपट होत असताना दुसरीकडे हेच इंजेक्शन तब्बल 22 हजार रुपयांना विक्री करताना धारूर तालुक्यातील दोन तरुणांना शिवाजीनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे .

बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात रेमडिसिव्हीर चा तुटवडा असल्याने अनेक रुग्ण आणि नातेवाईक हैराण झाले आहेत .अशावेळी बीडचे जिल्हा प्रशासन देखील हतबल झाले आहे,काही ठिकाणी डियाचार्ज झालेल्या रुग्णांच्या नावावरील इंजेक्शन परस्पर विक्री होत आहे तर काही ठिकाणी मृत रुग्णांच्या नवे आलेले इंजेक्शन नातेवाईक विक्री करत आहेत.

काही मेडिकल चालक चढ्या भावाने इंजेक्शन विकत आहेत, इंजेक्शन साठी राजकारणी आणि सामान्य माणूस मरमर करत असताना दुसरीकडे शहरातील शिवाजी नगर भागात दोन तरुण रेमडिसिव्हीर विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे आणि इतरांनी सापळा रचून श्रेयस नाईकवाडे धारूर आणि कृष्णा ठोंबरे केज या दोन तरुणांना हे इंजेक्शन 22 हजार रुपयांना विक्री करताना पोलिसांनी पकडले .

या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *