बीड – राज्य शासनाने जिल्ह्या बाहेर प्रवास करण्यासाठी ई पास आवश्यक आल्याचे म्हटले आहे,याबाबत सगळीकडे बातम्या देखील आल्या आहेत,मात्र अनेक जणांनी बाहेर गावाला जाण्यासाठी ई पास मिळावा म्हणून अर्ज केला मात्र टोकन आय डी नंतर पास मिळत नसल्याने वैताग आला आहे .जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने याबाबत अद्याप तरी काहीच यंत्रणा सुरू करण्यात आली नसावी म्हणून लोकांना या अडचणी येत आहेत .
राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत,1 मे पर्यंत हे निर्बंध असून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आता अंत्यसंस्कार, आजार आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करता येणार आहे,मात्र त्यासाठी देखील ई पास आवश्यक करण्यात आला आहे .
याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनेक व्यापारी, सामान्य व्यक्ती यांनी इ पास साठी ऑनलाइन अर्ज केले आहेत,मात्र त्यांना टोकन आय डी मिळाल्यावर पुढे काहीच कारवाई होत नसल्याचे दिसत आहे .याबाबत माहिती घेतली असता मागच्या वेळी इ पास साठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने जी यंत्रणा उभारली होती ती अद्याप उभारण्यात आली नसल्याने या अडचणी येत असाव्यात असे सूत्रांनी सांगितले, याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लक्ष घालून लोकांची अडचण दूर करण्याची गरज आहे .