October 18, 2021

डिस्चार्ज झालेल्या,मृत रुग्णांच्या नावाने आलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार !

डिस्चार्ज झालेल्या,मृत रुग्णांच्या नावाने आलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार !

बीड – एकीकडे रेमडिसिव्हीर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झालेला असताना काही खाजगी रुग्णालयात आणि सरकारी रुग्णालयात एकाच इंजेक्शन दुसऱ्याला अन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच इंजेक्शन मार्केट मध्ये विक्री होण्याचे प्रकार घडत आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे .

बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोना रुग्णांसाठी दिले जाणारे रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने अडचणी येत आहेत .शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एका एका इंजेक्शन साठी चार चार दिवस भटकत आहेत .अनेक ठिकाणी दोन हजराच्या इंजेक्शन साठी वीस हजार मोजावे लागत आहेत .

इंजेक्शन आणण्यासाठी पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे .बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी रेमडिसिव्हीर सहज मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत .मात्र अन्न आणि औषध प्रशासनातील डोईफोडे सारखे उलट्या काळजाचे लोक मेडिकल आणि खाजगी रुग्णलायशी संगनमत करून रुग्णांची सर्रास लूट करत आहेत .

यात आणखी एक नवा धंदा समोर आला आहे .काही खाजगी रुग्णालयात 19 तारखेला रेमडिसिव्हीर ची नोंदणी केलेल्या रुग्णाला 20 किंवा 21 ला सुट्टी मिळाली अन इंजेक्शन 22 तारखेला हातात पडले, मग त्याच्या नातेवाईकांनी हे इंजेक्शन खुल्या बाजारात दुप्पट तिप्पट भावात विक्री केले,तर काही ठिकाणी इंजेक्शन चा वेळेत पुरवठा झाला नाही म्हणून रुग्ण दगावला अन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इंजेक्शन रुग्णालयाला उपलब्ध झाले,मग काय रुग्णालयानेच परस्पर इंजेक्शन दुसऱ्या रुग्णाला चढ्या भावाने दिले .

हा सगळा प्रकार सर्रास खाजगी रुग्णालयात घडत आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही .दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन दिल्याची नोंदणी करण्यात आली,प्रत्यक्षात मात्र एकच इंजेक्शन दिल्याचे रुग्ण सांगत आहेत .तर काही रुग्णांना तीन इंजेक्शन दिले असल्याचे प्रिस्क्रिप्शन वर नोंदणी केली आहे,प्रत्यक्षात मात्र दोनच इंजेक्शन दिले आहेत .

याचाच अर्थ जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन चोरून बाहेर विक्री करणारी टोळी कार्यरत आहे की काय अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे .आता या इंजेक्शन चे सर्व अधिकार उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे दिले आहेत,हा असा चालणारा नवा कालाबाजर थांबवायचा असेल तर रुग्णाला इंजेक्शन दिल्यानंतरचा फोटो काढून त्या त्या रुग्णालयांनी तो जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी ,सीएस यांच्या ग्रुपवर अपलोड करण्याची शक्ती केल्यास हा कालाबाजर थांबेल .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *