February 2, 2023

या समाजात राहायची आम्हाला लाज वाटत आहे – न्यायालयाचे ताशेरे !

या समाजात राहायची आम्हाला लाज वाटत आहे – न्यायालयाचे ताशेरे !

नागपूर – राज्य सरकारच्या कुचकामी धोरणावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत .कोरोनावर उपाययोजना करण्यात सरकार कमी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत अन ही गोष्ट लाजिरवाणी आहे अस मत नागपूर न्यायालयाने व्यक्त केलं आहे .

जर तुम्हाला तुमची लाज वाटत नसेल तर आता आम्हाला या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते आहे. महाराष्ट्रातील असहाय रुग्णांसाठी आम्ही काहीही करू शकत नाही आहोत.तुमच्याकडे यावर काहीच उपाय नाही, काय मूर्खपणा आहे हा ?”, या शब्दात न्यायालय राज्य सरकारच्या अधिकार्‍यांवर बरसले. राज्यातील कोरोना परिस्थितीच्या अपयशी हाताळणीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर दररोज टीका होत असताना आता न्यायालयातही सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठासमोर ऑक्सिजन, रेमडीसिवीरची कमतरता यामुळे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी सुरू होती. न्यायालयाने आपणहून (Suo Moto) या प्रकरणावर जनहितार्थ सुनावणी घेतली आहे. त्यासोबत काही नागरिकांनीही याचिका दाखल केल्या होत्या. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शहरातील कोव्हिड रुग्णालयांना दहा हजार रेमडीसिवीर वायल्स पुरविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशची अंमलबजावणी झाली नाही. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्र विरोधाभासी आहेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. राज्य सरकारचे हे अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

नागपुरला देण्यासाठी रेमडीसिवीरच्या वायल्स उपलब्ध नाहीत, असे आपल्याला राज्य सरकारकडून सांगण्यात आले असल्याची माहिती नागपुरच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयाला दिली. ‘याचा काय अर्थ होतो’, असा प्रश्न न्यायमुर्तींनी विचारला. तर अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त यांनी वेगळीच माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन स्वतः खरेदी करणारी संस्था नसल्यामुळे आम्ही आदेशाची अम्मलबजावणी करू शकत नाही, असे न्यायालयाला अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारी याप्रकरणी सलग दोन सुनावणी घेण्यात आल्या. मात्र सरकारचे अधिकारी समर्पक उपाय शोधू शकले नाहीत. मग मात्र न्यायमुर्तींनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

राज्यस्तरावर रेमडीसिवीरच्या समान वितरणासाठी कोणतीच उपाययोजना नाही, यावर सुनावणीदरम्यान आश्चर्य व्यक्त करण्यात आले. राज्य स्तरावर कोणतीही समिती अस्तित्वात नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनीच दिली. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click