मुंबई – राज्यातील कोरोना रोखण्यासाठी आज रात्रीपासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता होती मात्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशामुळे लॉक डाऊन होणार नसून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत .सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थितीत काम करावे लागणार असून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत .
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी लॉक डाऊन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती,मात्र राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबत नवी नियमावली जारी केली आहे .यापुढे केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती असेल,लग्न कार्यात केवळ 25 लोक असतील आणि दोन तासात लग्न उरकावे लागेल,जास्त लोक आढळून आल्यास 50 हजार दंड भरावा लागेल,खाजगी वाहनातून 50 टक्के प्रवासी वाहतूक,उभा राहून प्रवास करता येणार नाही,अत्यावश्यक सेवेसाठी आंतरजिल्हा प्रवास करता येईल,यात काही चूक आढळून आल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल,खाजगी प्रवासी वाहनातून 50 टक्के प्रवासी वाहतूक करता येईल,प्रवाशांची थर्मल स्कानिग, प्रवासादरम्यान केवळ दोन स्टॉप घेता येतील,बेकायदेशीर काही आढळले तर 10 हजार रुपये दंड भरावा लागेल,रेल्वे, बस ने फक्त सरकारी कर्मचारी प्रवास करू शकतील असे नियम लावण्यात आले आहेत .
या नव्या नियमानुसार एक गोष्ट स्पष्ट आहे की लॉक डाऊन लागणार नाही,पूर्वीचे जे किराणा व इतर बाबत चे आदेश तसेच आहेत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही .