अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अकरा रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .वयस्कर आणि अतिगंभीर असलेल्या या रुग्णांच्या मृत्यूने प्रशासन हैराण झाले आहे .
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे,जिल्हा रुग्णालयासह सर्वच कोविड केयर सेंटर हाऊसफुल आहेत .अंबाजोगाई येथील एस आर टी रुग्णालयात दाखल असलेल्या नऊ आणि तपासणीसाठी आलेल्या दोन रुग्णांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .
यातील सहा रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचा नातेवाईकांचा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे .