December 10, 2022

धनुभाऊ, वॉर रूम ताब्यात घ्या,अन यंत्रणा कामाला लावा !

धनुभाऊ, वॉर रूम ताब्यात घ्या,अन यंत्रणा कामाला लावा !

बीड – बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अत्यन्त कुचकामी झाली असून ऑक्सिजन नाही,रेमडिसिव्हीर नाही, बेड नाहीत अशी अवस्था आहे,रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अक्षरशः फरपट सुरू आहे,जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि महसूल ,जिल्हा रुग्णालय यंत्रणा सलाईन वर आहे,त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वॉर रूम तयार करून त्याचा ताबा स्वतःकडे घ्या,बीडला येऊन बसा अन यंत्रणा कामाला लावा तरच बीडची भयावह परिस्थिती नियंत्रणात येईल .

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दररोज हजारापेक्षा जास्त होत आहे .बीड जिल्हा रुग्णालयासह ,एस आर टी अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव सह तब्बल 85 कोविड केयर सेंटर आणि खाजगी रुग्णालयातील कोविड केयर सेंटर मध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत .

बीड जिल्ह्यात तीन दिवस झाले लिक्विड ऑक्सिजन संपले आहे,आ संदिप क्षीरसागर यांनी बीडमधून बाहेर जिल्ह्यात जाणारे सिलेंडर रोखून धरल्याने काही तासाच काम भागल .मात्र रेमडिसिव्हीर ची बोंब कायम आहे,जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडर चा तुटवडा कायम आहे .

आज देखील पंधरा मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त झाले आहे मात्र त्यातही राजकारणी मंडळींनी हस्तक्षेप सुरू केला आहे .जणू काही टेंडर आणि त्याच बिल काढायचं आहे अशा पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बसून प्रेशर केलं जातं आहे .जिल्हाधिकारी जगताप मात्र काहीच करू शकत नाहीत या पद्धतीने हतबल झाले आहेत .

ऑक्सिजन साठी एसडीएम आणि दोन नायब तहसीलदार यांची तर रेमडिसिव्हीर साठी उपजिल्हाधिकारी आणि तीन इतर लोक बसवले आहेत,मात्र कोणाचाच कोणाला मेळ नाही अशी स्थिती आहे .एफडीए चे डोईफोडे हे तर कोणाचाच ऐकत नाहीत अशी स्थिती आहे,ते आमदार असो की पालकमंत्री सगळ्यांना नकार घंटा वाजवत आहेत .

जिल्हा रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात ज्या कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत यांच्यासह नातेवाईक यांची फरपट सुरू आहे .जिल्हाधिकारी काहीच नियंत्रण नसल्यासारखे झाले आहेत,त्यामुळे आता परळी ला बसून यंत्रणा कामाला लावण्यापेक्षा बीडला या ,जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करा आणि इथं बसून कारभार हातात घ्या .

धनुभाऊ आता तुम्ही फिल्डवर उतरल्याशिवाय ढिम्म झालेली यंत्रणा कामाला लागणार नाही,बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गित्ते तर काहीच कामाचे नाहीत,त्यांना फोन उचलायला सुद्धा वेळ नाही ,ते जिल्हा रुग्णालयात चक्कर देखील मारत नाहीत,रेमडिसिव्हीर चे नियंत्रण स्वतःकडे ठेवून मेलवर रुग्णांची माहिती मागवून घेण्यापेक्षा त्यांनी खाजगी मेडिकल कडे नियंत्रण दिले आहे .

हा सगळा प्रकार रोखायचा असेल तर स्वतः धनंजय मुंडे यांनाच सारी सूत्रे हातात घेऊन कारभार पहावा लागेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click