बीड – संपूर्ण महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला असून शासनामार्फत बीड जिल्ह्याला आज दुपारपर्यंत साडे पंधरा मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे हे लिक्विड ऑक्सिजन जिल्हा जिल्हा प्रशासनाने स्वतः लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयासह इतर जी रुग्णालय आहेत त्यासाठी रुग्णांच्या संख्येनुसार वाटप करून घेणे आवश्यक आहे तरच ऑक्सिजनचा निर्माण होणारा तुटवडा यापुढे जाणवणार नाही.
बीड जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता राज्यात बहुतांश जिल्ह्यात हीच परिस्थिती होती रात्री उशिरापर्यंत लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमधील रुग्णांचे प्राण कंठाशी आले होते बीड येथील ऑक्सीजन निर्मिती प्लांट मधून इतर जिल्ह्यात देखील ऑक्सिजन पुरवठा केला जातो जिल्ह्यातच ऑक्सीजन पुरेसा मिळत नसेल तर तर इतर जिल्ह्यात पुरवठा कसा केला जाऊ शकतो
त्यामुळे हा प्रश्न घेऊन बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तळ ठोकत तातडीने दीडशे सिलेंडर ऑक्सिजन उपलब्ध करून घेतले होते त्यानंतर बीड जिल्ह्याला लागणारा बावीस मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलून बीड जिल्ह्यासाठी लिक्विड ऑक्सिजन तातडीने देण्याची आग्रही मागणी केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीडला लिक्विड ऑक्सिजन चा पुरवठा दुपारपर्यंत होत आहे,त्याचे योग्य वाटप होणे आवश्यक आहे .
बीड जिल्ह्यात जे लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे त्याचं वाटप रुग्ण संख्येनुसार आणि गरजेनुसार आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण स्वतः या वाट पावर लक्ष देऊन असून प्रशासनाला देखील त्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत कोणत्याही रुग्णाचे प्राण ऑक्सिजन अभावी संकटात येऊ नयेत यासाठी आपण स्वतः लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली