मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही तासानंतर कडक आणि संपूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा बाबत निर्णय घेण्यात येईल .अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली .
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना या एकाच विषयावर चर्चा करण्यात आली,बहुतांश मंत्र्यांनी कडक लॉक डाऊन ची मागणी केली .त्यानंतर येत्या चोवीस तासात कडक लॉक डाऊन लावण्यात येईल अस टोपे यांनी सांगितले .
दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेतील,त्याच सोबत ऑक्सिजन जनरेटर सिस्टीम प्रत्येक जिल्ह्यात सुरू केले जाईल,18 वर्षापुढील लसीकरण लवकरच करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल .अशी माहिती देखील टोपे यांनी दिली .