बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाची बाराशे ,साडे बाराशे च्या पुढे गेलेली कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी मात्र दोनशे ने कमी होत 1024 वर थांबली .बीड,अंबाजोगाई मध्ये 200 पेक्षा जास्त तर परळी,केज आणि आष्टीत शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा जवळपास दररोज पाचशे पासून सुरू होऊन बाराशे च्या पुढे गेला आहे .विशेष म्हणजे पाच ते सहा तालुक्यातील आकडेवारी झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे .
जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये 231,बीड 206,परळी 101,केज 122,माजलगाव 50,धारूर 50,आष्टी 111,पाटोदा 47,शिरूर 46,गेवराई 45 आणि वडवणी मध्ये 15 रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णालयात ऑक्सिजन, बेड आणि इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे .