May 18, 2021

खासदार डॉक्टर असल्याचा फायदा !थेट कोविड रुग्णांशी संवाद अन दिलासा !

खासदार डॉक्टर असल्याचा फायदा !थेट कोविड रुग्णांशी संवाद अन दिलासा !

बीड – देशात कोविड ने थैमान घातले असताना आणि सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी मात्र आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करत जिल्ह्यातील सर्वच रुग्णालय,कोविड केयर सेंटर मध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्यासोबत उपचारांची माहिती घेतली .

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहव,जिल्ह्यातील रुग्णसंख्या देखील दररोज हजाराच्या पुढे आहे .अशावेळी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी काम करत आहे,दरम्यान बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा ,शिरूर,माजलगाव,गेवराई अशा विविध रुग्णालय आणि कोविड केयर सेंटर ला भेटी दिल्या .

केवळ भेटीच दिल्या नाहीत तर स्वतः पीपीई किट घालून वार्डाची पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला .तेथील भोजन,इतर सुविधा याची पाहणी केली .औषध उपचार मिळतात का याची माहिती घेतली .त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेत जिल्हा भाजप च्या वतीने एक हजार पीपीई किट प्रशासनाला सुपूर्द केल्या .

डॉक्टर खासदार असल्यावर प्रत्यक्ष कस काम होऊ शकत हे यानिमित्ताने प्रीतम मुंडे यांनी दाखवून दिलं .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *