बीड – जिल्हा रुग्णालयासह मेडिकल कॉलेज,लोखंडी सावरगाव आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर चा तुटवडा निर्माण झालेला असताना बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गित्ते हे सकाळपासून रुग्णालयाकडे फिरकले सुद्धा नाहीत,तर बीड चे आमदार संदिप क्षीरसागर मात्र रात्री एक वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते,त्यांनी जिल्ह्याबाहेर जाणारे तब्बल दिडशे सिलेंडर ची तातडीने व्यवस्था करत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली आहे .
राज्यातील अनेक भागात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण झाला आहे,त्यामुळे विशाखापट्टणम येथून लिक्विड मागवले जात आहे .राज्यातील जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती बीड जिल्हा रुग्णालयात आहे .मात्र बीड जिल्हा रुग्णालयाचे सी एस गित्ते हे याकडे पाठ फिरवून सकाळपासून गायब आहेत .
ही माहिती मिळाल्यानंतर बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क करत लिक्विड ची व्यवस्था करण्याची मागणी केली .त्यानंतर स्वतः आ क्षीरसागर हे जिल्हा रुग्णालयात रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल झाले .त्यांनी खाजगी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांट वरून तब्बल दिडशे सिलेंडर उपलब्ध केले .
बीड जिल्हा रुग्णालयाला दररोज 790 जम्बो सिलेंडर, मेडिकल कॉलेज ला 473 जम्बो सिलेंडर लागतात त्याशिवाय इतर खाजगी रुग्णलायला लागणाऱ्या सिलेंडर ची संख्या मोठी आहे .गेल्या एक दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हा रुग्णालयात होणारा लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण झाला .
ऑक्सिजन अभावी रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आ क्षीरसागर हे स्वतः प्लांट वर गेले आणि जिल्ह्या बाहेर जाणाऱ्या सिलेंडर च्या गाड्या जिल्हा रुग्णालयात आणत बीडच्या रुग्णांची मदत करण्यास प्राधान्य दिले .