बीड – जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन सिलेंडर चा तुटवडा भासत आहे त्यामुळे सामाजिक संघटना,सेवाभावी संस्था आणि सामान्य बीड कर नागरिकांनी घरात जर ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक असतील तर ते ऑक्सिजन साठवण्यासाठी प्रशासनाला द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे .
बीड जिल्ह्यात दररोज हजार च्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत .त्यामुळे आरोग्य व्यवस्थे सोबत जिल्हा प्रशासनावर देखील ताण वाढत आहे .विशेषतः ऑक्सिजन चा पुरवठा मर्यादीत असल्याने आणि ऑक्सिजन साठवण्याची क्षमता नसल्याने आता घरगुती उपचारासाठी ऑक्सिजन सिलेंडर मध्ये हा ऑक्सिजन साठवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .तसेच काही उद्योजक यांच्याकडे जर औदयोगिक वापरासाठी ऑक्सिजन सिलेंडर असतील तर ते प्रशासनाला द्यावेत असे आवाहन केले आहे .
त्यासाठी घरात काही लोक आजारी असल्या कारणाने ऑक्सिजन सिलेंडर आहेत ते वापरात आणले जाणार आहेत .ज्या संस्था,सामाजिक संघटना आणि ग्राहकांकडे घरगुती वापराचे जास्तीचे सिलेंडर असतील ते त्यांनी प्रशासनाला द्यावेत,त्याची रीतसर पावती दिली जाईल .
जेव्हा प्रशासनवरील ताण कमी होईल आणि पुरेशा प्रमाणात सिलेंडर उपलब्ध होतील तेव्हा पावती दाखवून आपले रिकामे सिलेंडर ग्राहकांनी घेऊन जावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .