चेन्नई – बंगलोर च्या 205 धावांचा पाठलाग करताना कोलकाता ची संपूर्ण टीम 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 166 धावांच करू शकली त्यामुळे बंगलोर ने हा सामना 38 धावांनी जिंकत मोठा विजय प्राप्त केला .
आरसीबी कडून खेळताना एबी डिव्हीलयर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी केलेल्या अर्धशतकामुळे बंगलोर ने वीस षटकात 205 धावा केल्या,हे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता ची टीम केवळ 166 धावा करू शकली .
कोलकाता कडून खेळताना नितीश राणा,रवी त्रिपाठी यांनी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र बंगलोर च्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यापुढे कोलकाता चा संघ 166 मध्ये आटोपला .