बीड – जिल्ह्यात कोरोना ने आपला हजार बाराशे चा स्कोर कायम ठेवला असून 4725 रुग्णपैकी 3580 निगेटिव्ह तर 1145 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत .जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये 219 तर बीड मध्ये 276 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज एक हजार पेक्षा जास्त आढळत आहे .रविवारी प्राप्त झालेल्या अहवालपैकी 3580 रुग्ण निगेटिव्ह आऊन 1145 पॉझिटिव्ह आहेत,यात अंबाजोगाई 219,आष्टी – 149,बीड 276,धारूर – 38,गेवराई – 89,केज 131,माजलगाव – 91,परळी – 59,पाटोदा – 47,शिरूर 31 आणि वडवणी मध्ये 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .