बीड – ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता मेडिकल वगळता इतर सर्व अस्थपणा या यापुढे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत,त्यामुळे रस्त्यावर विनाकारण होणाऱ्या गर्दीला ब्रेक बसेल हे नक्की .

पाच एप्रिलपासून बीड जिल्ह्यासह राज्यात कडक निर्बंध सुरू होते,त्यात 14 एप्रिल पासून अधिकचे निर्बंध लावले गेले,मात्र तरीदेखील रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याचे लक्षात आल्याने अखेर सोमवार पासून पूर्वीच्या आदेशात बदल केले गेले आहेत .
नव्या आदेशानुसार मेडिकल वगळता किराणा, भाजीपाला,फळविक्री,बेकरी,चिकन मटण विक्रीची दुकाने सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे .त्याचसोबत हातगाड्यावर फिरून विक्री करण्यासाठी सायंकाळी पाच ते सात या वेळेत परवानगी देण्यात आली आहे .
जिल्हाधिकारी जगताप यांच्या या आदेशामुळे विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करत कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या नागरिकांना चाप बसेल हे निश्चित .