बीड – बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयातील नर्सिग हॉस्टेलमधील ६५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करून घेतल्याने बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णलयातील कोव्हिड वार्डात जावून त्यांना येणार्या अडचणी समजवून घेत, त्यांना आधार देत त्या समस्या ऑन दी स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जिल्हा रूग्णालयासह त्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज येथील कोव्हिड सेंटरचा आढावा घेत वार्ड बॉय, स्वच्छता, डाटा इंट्रीसह आवश्यक मॅन पावर घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत. रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या सर्वजण मिळवून कोरोना हरविण्यासाठी लढुयात. कोरेानाच्या या संकट काळात निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.
शनिवार दि.१७ एप्रिल २०२१ रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालय येथील कोव्हिड रूग्णालय, लॉ कॉलेज, आयटीआय, पॉलिटेक्निक येथील कोव्हिड सेंटरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गिते, आरएमओ राठोड, डॉ.हुबेकर, डॉ.आंधळकर, संगिता धिंडकर आदी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा रूग्णालय परिसरात नर्सिंग हॉस्टेलमध्ये कोव्हिड वार्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतू ऑक्सिजन वार्ड तयार करण्याचे काम संतगतीने सुरू होते, यावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी उभा राहूनच हॉस्टेलमधील ६५ ऑक्सिजनचे बेड कार्यान्वित करून घेतले आणि उर्वरित तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेच्या शिष्ट मंडळाने आपल्या व्यथा आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या कानी टाकल्या. परिचारीका भगिणींच्या अडचणी समजवून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. संघटनेच्या मागणीनुसार वॉर्ड बॉय, डाटा इंट्री ऑपरेटर, स्वच्छता कामगार तातडीने वाढवण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
कोव्हिडच्या परिस्थितीत आपण सगळे एकत्र येवून लढतोय, आपल्या एकी, स्वंयशिस्त एकमेकांना आधार देणे यावेळी अत्यंत आवश्यक आहे. ही परिस्थिती कठीण असल्याची जाणीव आहे. परंतू यातून मार्ग काढून आपण पुढे जावू या, या कोरोना काळात निधीची कमतरता पडू देणार नाही, रूग्णांची गैरसोय होता कामा नये यासाठी सर्वांनीच खबरदारी व आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केली आहे.

आ.संदिप क्षीरसागर यांच्या स्थानिक निधीतून कोव्हिड संदर्भात आवश्यक ती उपाय योजना करण्यासाठी निधी तर दिला जाणारच आहे परंतू कार्डियाक रूग्णवाहिका घेण्याचा निर्णय ही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी घेता असून या बाबत तशा सूचनाही त्यांनी जिल्हा रूग्णालय प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत. त्यामुळे आता बीडच्याजिल्हा रूग्णालयात कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध होणार आहे