बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा जो आजवर एक हजार च्या घरात होता,शनिवारी तो बाराशेच्या पार गेला,कोरोना रोखण्यासाठी सरकारने लॉक डाऊन किंवा कडक निर्बंध लावले असले तरी लोकांचा मुक्तसंचार कोरोना वाढीस आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे .
बीड जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 4262 अहवालात तब्बल 1211 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये अंबाजोगाई – 337,आष्टी 119,बीड 143,धारूर 47,गेवराई 39,केज 112,माजलगाव 65,परळी 138,पाटोदा 99,शिरूर 58,वडवणी 59
बीड जिल्ह्यात दररोज वाढणारे रुग्ण पाहता जिल्हा शासकीय रुग्णालय आणि इतर 85 कोविड केअर सेंटर मधील बेड फुल झाले आहेत .शासकीय आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण येत असल्याचे दिसून येत आहे .
बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कार्यरत असली तरी लोक मात्र विनाकारण बाजारात गर्दी करत आहेत,सायंकाळी रोजा सोडण्यासाठी म्हणून खरेदी ला आणि दिवसा भाजीपाला ,किराणा च्या नावाखाली लोक बेफिकीर पणे फिरत आहेत .यांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील हे नक्की .