December 10, 2022

शारदा हॉस्पिटलची सोशल जबाबदारी !कोविड केयर चे लोकार्पण !!

शारदा हॉस्पिटलची सोशल जबाबदारी !कोविड केयर चे लोकार्पण !!

गेवराई दि. १७ (प्रतिनिधी) सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य समजून हे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, आजार अंगावर काढून रुग्णांच्या निष्काळजीपणा मुळे स्कोअर वाढत असून ही चिंतेची बाब आहे, त्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करुन लक्षणे दिसणा-यांनी तातडीने चाचणी करुन घेण्याचे आवाहन करत गेवराई तालुक्यात रुग्ण वाढू नये अशी अपेक्षा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. गेवराई येथील जयभवानी शिक्षण संकुलात शारदा हाँस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते.

कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्‍वभुमीवर गेवराई तालुक्यातील जयभवानी शिक्षणसंकुलात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सुरु केले असून पहिल्या टप्प्यात १०० खाटांचे सेंटर कार्यान्वित करुन त्याचे लोकार्पण शनिवार दि.१७ एप्रिल रोजी झाले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, नायब तहसिलदार प्रशांत जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, सहा. पोलीस निरीक्षक संदीप काळे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करत हा समारंभ झाला. अतिशय प्रशस्त जागेत कोविड केअर सेंटर सुरू करताना येथील रुग्णांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या मनोरंजनासाठी टिव्ही, दररोज वर्तमानपत्र, मोबाईल चार्जिंग पॉईंट, वायफाय यासह चांगल्या दर्जाचे बेड, गादी व इतर सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनचे विस बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. लवकरात लवकर रुग्ण बरा व्हावा या दृष्टीने येथे सुविधा निर्माण केल्या आहेत.

यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम म्हणाले की, अडचणीच्या काळात प्रशासनाला कायम सहकार्य करण्याची भुमिका अमरसिंह पंडित घेत असतात त्यांनी अतिशय सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभा करुन आरोग्य विभागाला मोठे सहकार्य केले आहे.सहा पोलीस निरीक्षक संदीप काळे म्हणाले की, प्रशासनाला या केअर सेंटरची खुप मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. चिंचोले म्हणाले की, गेवराई तालुक्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी खुप मोठे पाऊल उचलले असून सुसज्ज केअर सेंटर उभा करुन आपले कर्तव्य पार पाडले आहे तर नायब तहसिलदार प्रशांत जाधवर म्हणाले की, ज्यांच्या नावातच सिंह आहे नावाप्रमाणेच त्यांनी सामाजिक कामातही सिंहाचा वाटा उचलला आहे.

कोविड केअर सेंटर येथे कर्तव्यावर असलेल्या सर्व स्टाफचे यावेळी स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, आरोग्य विभागाचे डॉ. भारत नागरे, डॉ. लगड, डॉ. वैभव, डॉ. शरद पवार, डॉ. आश्विनी देशमुख , आनिता निर्मळ, शितल निसर्गध यांच्यासह पारिचारीका उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click