December 6, 2022

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ही आहेत कारणे !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ही आहेत कारणे !

नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट एवढ्या प्रभावाने का वाढते आहे याची कारणे शोधणाऱ्या शास्त्रज्ञानी काही मुद्दे उपस्थित केले आहेत,यावेळचा कोरोना हा हवेतून पसरत असल्याचा दावा करताना नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे देखील या लोकांनी सुचवले आहे .

व्हायरसचे सुपरस्प्रेडिंग इव्हेंट SARS-COV-2 विषाणूला वेगाने पसरवतात. खरंतर, हे या महामारीचे सुरुवातीचे वाहक असू शकतात. असा प्रसार थेंबांऐवजी हवेतून होणे सहज शक्य आहे.

उदा. क्वारंटाइन हॉटेल्समध्ये एकमेकाला लागून असलेल्या खोल्यांमधील व्यक्तींमध्ये हा संसर्ग आढळून आलाय, हे लोकं ऐकमेकांच्या खोल्यांमध्ये गेलेही नव्हते, तरीही विषाणूचा प्रसार आढळलाय.

तज्ज्ञांचा असा दावा आहे की, खोकला किंवा शिंका येत नसूनही सर्व कोविड-19 प्रकरणांपैकी 33 ते 59 टक्के हे लक्षणे नसलेल्या किंवा लक्षणे असलेल्या ट्रान्समिशनसाठी जबाबदार असू शकतात.आउटडोर (बाहेर) पेक्षा विषाणूचे संक्रमण इनडोर (घरातून) जास्त होते आणि जर घरात योग्य व्हेंटिलेशन असेल तर विषाणूच्या प्रसाराची संभाव्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरल्या त्या ठिकाणी नोसोकॉमियल इन्फेक्शन (जे रुग्णालयात उद्भवतात) देखील आढळले. पीपीई किट ही थेट संपर्क आणि ड्रॉपलेटपासून सुरक्षेसाठी बनविली गेली आहे, परंतु हवेतून प्रसार टाळण्याचा कोणताही मार्ग नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सार्स-कोव्ह -2 हवेत सापडला आहे. सार्स-कोव्ह-2 विषाणू लॅबमध्ये कमीत कमी 3 तास हवेत संसर्गजन्य राहिलेला दिसून आला आहे. कोरोना रुग्णांच्या खोल्या आणि कारमधील हवेच्या नमुन्यांमध्येही हा विषाणू आढळून आला,कोरोना रुग्णालयांतील एअर फिल्टर्स आणि बिल्डिंग डक्ट्समध्येही हा विषाणू आढळला आहे. या ठिकाणी फक्त हवेच्या माध्यमातूनच विषाणू पसरू शकतो.

तज्ज्ञांना आढळले की, पिंजऱ्यांमध्ये बंद प्राण्यांनाही विषाणूची बाधा झाली. हे एअर डक्टच्या माध्यमातूनच घडले.तज्ज्ञ असेही म्हणतात की, हा विषाणू हवेतून पसरत नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

त्यांचा अखेरचा युक्तिवाद असा आहे की, श्वासोच्छवासाचे थेंब किंवा फोमाइटसारख्या इतर मार्गांनी व्हायरस पसरल्याचे जसे पुरावे आहेत, तसे इतर मार्गांनी तो पसरू शकतो याचे फारसे पुरावे नाहीत.

जर तज्ज्ञांचा हा नवीन दावा सिद्ध झाला आणि मान्य केला तर कोरोनाविरुद्ध लढाईतील रणनीतीत संपूर्ण जगाला बदल करावा लागणार आहे. यामुळे तुम्हाला आता घरातही मास्क घालून राहावे लागू शकते. कदाचित तो कायमच तोंडावर लावावा लागेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click