बीड – बीड परळी रस्त्यावर असलेल्या पांगर बावडी येथील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळच्या सुमारास घडली,घटनास्थळी पोलीस पोहचले असून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे .
पांगर बावडी येथे काही तरुण मुलं पोहण्यासाठी गेले होते,मात्र यातील तिघे जण बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे .नेमके किती जण पोहण्यासाठी गेले होते,किती जण बुडाले आहेत याबाबत पोलीस तपास करत असून तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .