बीड – जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून कोरोनाचा हजार पार जात असलेला आकडा शुक्रवारी देखील का राहिला, यात सर्वाधिक तीनशे पार आकडा हा बीडचा आहे तर आष्टी दोनशेच्या घरात आहे .वाढत असलेले आकडे भयावह आहेत हे नक्की .
बीड जिल्ह्यात शुक्रवारी 3655 रुग्णांची तपासणी केली असता त्यात अंबाजोगाई 142,आष्टी 198,बीड 342,धारूर 29,गेवराई 67,केज 98,माजलगाव 60,परळी 29,पाटोदा 21,शिरून 21 आणि वडवणी मध्ये 22 रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात शुक्रवारी आलेले आकडे हे जिल्हा वासीयांची बेफिकिरी वृत्ती दाखवणारे आहेत,कोरोना कितीही वाढला तरी आम्ही बाहेर बोंब मारत फिरणं सोडणार नाही .बेड मिळो की न मिळो आम्हाला त्याच्याशी देणंघेणं नाही,आम्ही घराबाहेर नाही पडलो तर दुनिया बंद पडेल,घरात बसून कितीवेळ टीव्ही पाहायचा अन कितीवेळ स्वयंपाक घर ते बेडरूम चकरा मारायच्या,त्यापेक्षा बाहेर जाऊन राउंड मारून आलं तर परिस्थिती कळते अस बीड करांना वाटत त्यामुळे संचारबंदी असताना देखील रस्ते मात्र हाऊसफुल आहेत .