बीड – बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रेमडिसिव्हीर इंजेक्शन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर चांगलंच रंगल आहे .पालकमंत्री यांच्या जिल्ह्यात केवळ वीस रेमडिसिव्हीर इंजेक्शन पोहच झाल्याचा आरोप करत माफिया राज होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली तर खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर माहिती घेऊन बोलत जावं,बीड जिल्ह्यात पुरेसा साठा आहे अन लस उपलब्ध आहेत अस सांगत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे .
राज्याच्या माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विटर वर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत .बीड जिल्ह्यात केवळ वीस इंजेक्शन शिल्लक असून पालकमंत्री यांनी माफियांना सूट दिली आहे .ज्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली असल्याचा आरोप केला आहे .केंद्र सरकारकडून राज्याला जेवढी लस मिळाली त्यात बीड जिल्ह्याला केवळ वीस डोस भेटल्याचा आरोप त्यांनी केला आहे .
दुसरीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र पंकजा मुंडे यांचे आरोप खोडुन काढत अभ्यास करून बोला अस म्हणत बीड जिल्ह्यात किती डोस शिल्लक आहेत अन किती वापर झाला आहे याची डिटेल आकडेवारी दिली आहे .खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर असे खोटे आरोप केले जातात,मात्र आरोप करण्यापूर्वी थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असत .अस म्हणत जर आरोप करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला तर बरे होईल अस म्हटलं आहे .